आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भीषण अग्निकांड:नांदेड फाटा येथे एका केमिकल कारखान्याला भीषण आग, एका मजूराचा मृत्यू; अनेक महिला अडकल्या असल्याची शक्यता

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आग इतकी भीषण आहे की, आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत.

पुणे शहरातील नांदेड फाटा परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. ताज्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही महिला अजूनही कारखान्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे.

अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिलेंडरच्या स्फोटाचे आवाज कारखान्याच्या आतून सतत ऐकू येत आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल

पुणे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.30 च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघाताच्या वेळी कारखान्यात 100 हून अधिक लोक काम करत होते. या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर कारखान्यात गोंधळ उडाला. स्फोटाच्या ठिकाणी उपस्थित एक व्यक्ती या आगीत अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...