आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भीषण आग:बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर; अग्निशमन दलाचे 6 बंब बोलावले

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग
  • आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी नाही

येथील बिबडेवाडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला बुधवारी अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी बोलावण्यात आले आहेत. भंगारात प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याने आग झपाट्याने पसरली. सोबतच, जवळपासच्या परिसरात धूरच-धूर पसरला आहे. आग इतकी भयंकर होती की दूरवरून सुद्धा आगीचे गोळे दिसत होते.

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून जवळपासच्या लोकांना दूर जाण्यास सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास त्यांना आग लागल्याची माहिती फोनवरून मिळाली होती. सोबतच, ही आग लेव्हल 2 ची आहे. तसेच यामध्ये अद्याप कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही. अग्निशमन विभागाचे 6 बंब आग विझवण्याचे काम करत आहेत. आग लागण्याचे नेमके कारण काय होते हे अद्याप कळू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...