आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Fire Update Urwade MIDC SVS Company : Company Owner Nikunj Shah Remanded In Police Custody Till June 13 In Urvade Fire Case

चौकशीनंतर कारवाई:उरवडे येथील आग प्रकरणात कंपनी मालक निकुंज शाह यास 13 जून पर्यंत पोलिस कोठडी

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून 5 लाख, तर केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळील रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. या आगीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. या आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. कंपनीत लागलेल्या आगीला कंपनी मालक जबाबदार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावरुन कंपनीचा मालक निकुंज शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून 13 जूनपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेता तपास केल्यानंतर कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले आहे. या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली आहे. या चौकशीनंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या वॉटर प्युरिफायर व सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. यात 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 महिलांसह 3 पुरुषांचा समावेश आहे. आगीमध्ये त्यांचे मृतदेह जळून खाक झाले. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून 5 लाख, तर केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. या केमिकल कंपनीत एकूण 41 कर्मचारी सोमवारी कामासाठी आले. आग लागली तेव्हा एकूण 37 कामगार कंपनीत होते. सोमवारी दुपारी अडीच वाजता केमिकलचे दोन स्फोट झाले आणि अल्पावधीत भीषण आग पसरली. आग आणि धुराचे आकाशात झेपावणारे लोट उपस्थितांना धडकी बसवणारे होते.

बातम्या आणखी आहेत...