आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी झालेल्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल सामन्याला हिंसक वळण मिळाले. सामना सुरु होत असतानाच खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी 13 खेळाडूंवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंडूच्या ताब्यावरून सुरु झालेल्या वादातून खेळाडूंमध्ये भांडण झाल्याने त्याला हिंसक वळण लागले. दोन संघांमधील या लढतीत 22 वर्षीय खेळाडूला छाती आणि खांद्याला दुखापत झाली. अर्णव लोणकर, अभिषेक सिंग आणि सारंग दोनाडकर यांच्यासह 13 जणांना पुणे पोलिसांनी विरुद्ध संघाच्या खेळाडूंवर मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे.
लाथाबुक्क्यांनी मारहाण
वीरेंद्र महेंद्र परदेशी (वय २२, रा. सहकारनगर) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल सामन्यातील उपांत्यफेरी सुरू होती. त्या वेळी चेंडूच्या ताब्यावरून वाद झाला. त्यानंतर वीरेंद्र परदेशी याच्या संघातील खेळाडूंना शिवीगाळ करण्यात आली. प्रतिस्पर्धी संघातील अकरा खेळाडू तसेच अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे परदेशी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या कलमान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 143, 324, 323 अन्वये डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. कांबळे अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.