आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुणे वनविभागार्तंगत निसर्गानुभव - 2023 कार्यक्रम राबविण्यात आला. वनपरिक्षेत्रामध्ये तयार केलेल्या पाणवठयाच्या ठिकाणी लाकडी मचाण तयार करून वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात प्राणीगणना करण्यात आली. यामध्ये रात्रभर जागे राहून वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने 22 प्रजातींच्या 313 वन्यप्राणी ( प्राणी ,पक्षी) यांच्या हालचालीची नोंद यावेळी घेण्यात आली.
पुणे वनविभाचे भौगोलिक क्षेत्र 7831 चौ.कि. मी असून 'वनक्षेत्र 873.24 चौ. कि. मी. इतके लाभले आहे. पुणे वनवृत्तातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी पुणे वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या इंदापूर, वडगाव मावळ, पुणे, पौंड, शिरोता, बारामती, भांबुर्डा, दौंड या आठ ठिकाणी वनपरिक्रमा करुन ही नोंद घेतली आहे.
यामध्ये प्रामुख्याने चिंकारा, लांडगा, तरस, खोकड, ससा, वानर, रानडुक्कर, भेकर, सांबर, मोर, साळिंदर, कोल्हा, धामणसाप, रानकोंबडा, माकड, चितळ, हरिण, घार, पोपट, मुंगुस, टिटवी, रानमांजर यासारख्या प्राणी पक्ष्यांचे दर्शन झाले. यामध्ये कोणकोणते प्राणी , पक्षी या परिसरात आहेत. त्यांची संख्या किती आहे. याची माहिती मिळाली. तसेच सामान्यांना वने व वन्यजीव याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने पुणे वन विभागाच्या वतीने निसर्गानुभव- 2023 हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम हा एन. आर. प्रवीण मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे, व राहुल पाटील भा.व.से. उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, व सहा. वनसंरक्षक मयुर बोठे, सहा. वनसंरक्षक दिपक पवार व सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व क्षेत्रिय कर्मचारी यांचे सहकार्याने पार पडली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.