आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडीलांनी व भावानेच 24 लाख रुपयांचे दागिने व नऊ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रारमुळ पुण्याच्या व सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने पाेलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी संबंधित महिलेच्या वडील व भावावर विश्रांतवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी साेमवारी दिली आहे.
रामलाल घाशीराम काेठारी, व अरविंद रामलाल काेठारी असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपींचे नाव आहे. सदरचा प्रकार 2016 पासून आतापर्यंत उघडलेला आहे. तक्रारदार महिलेचे रामलाल काेठारी हे वडील असून अरविंद काेठारी हे भाऊ आहे. सदर महिलेच्या पहिल्या पतीकडून मिळालेले 24 लाख रुपयांचे एकूण 425 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने वडील व भावाकडे विश्वासाने ठेवलेले हाेते. तसेच पुर्वाश्रमीच्या पहिल्या पतीपासून पाेटगी म्हणून डीडी मार्फत मिळालेले नऊ लाख रुपयांची रक्कम तक्रारदार यांनी भाऊ अरविंद काेठारी यांच्या बँक खात्यात जमा केली हाेती.
त्यानंतर तक्रारदार यांनी वारंवार सदर पैसे व दागिने परत करण्याबाबत मागणी करुन देखील वडील व भावांनी एकूण 33 लाख रुपयांची मालमत्ता परत न करता, तक्रारदार यांना शिवीगाळ करुन धमकी देऊन एकमेकांच्या संगनमताने महिलेचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास डेक्कन पाेलीस करत आहे.
लग्नाचे अमिषाने तरुणीवर बलात्कार
लग्नाचे अमिष दाखवून एका 32 वर्षीय तरुणाने वेळाेवेळी तिच्या इच्छे विरुध्द जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. तिने त्याच्याकडे लग्नाबाबत वेळाेवेळी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन तिच्याशी संर्पक करणे बंद करुन तिची फसवणुक केली आहे. याप्रकरणी अविनाश हनुमंत नाईकवाडे (वय- 32, रा. गाेकुळनगर, पुणे) या तरुणावर वारजे पाेलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.