आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात नोकरीच्या अमिषाने एकाची फसवणूक:रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये नोकरीच्या नावाने 8 लाखांचा गंडा; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाेकरीच्या अमिषाने फसवणुक करण्याचे प्रकार घडत असतानाच असाच आणखी एक प्रकार पुणे रेल्वे स्थानकात घडला आहे. पुणे रेल्वे स्टेशन वरील आर.एम.एस (रेल्वे मेल सर्व्हिस) मध्ये नाेकरी लावून देण्याचे अमिषाने भामटांनी दहा जणांची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आराेपींवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

अभिषेक विजय तांबे (रा.कात्रज,पुणे), याेगेश संताराम माने व निलेश संताराम माने (रा.ताडीवाला राेड,पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत पोलिसांकडे आराेपी विराेधात अहमद सिंकदर शेख (वय-39,रा.लाेहगाव,पुणे) यांनी तक्रार दाखल केलेली आहे. सदरचा प्रकार 15/12/2022 ते 2/2/2022 यादरम्यान पुणे रेल्वे स्टेशन जवळील साहेबराव हाॅल व पार्सल गेट समाेरील रस्त्यावर घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी अभिषेक तांबे व याेगश माने यांनी आपआपसात संगनमत करुन तक्रारदार अहमद शेख , त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे इतर नऊ जण यांना पुणे रेल्वे स्टेशन येथील रेल्वे मेल सर्व्हिस मध्ये नाेकरी लावून देताे असे खाेटे अमिष दाखवले. त्याकरिता दहा जणांकडून सुमारे आठ लाख रुपये आराेपींनी ऑनलाईन गुगल पे अकाऊंट व राेखीने स्विकारले. पुणे रेल्वे स्टेशन येथील रेल्वे मेल सर्व्हिस विभाग याठिकाणचे नाेकरीचे बनावट स्वाक्षरीचे व भारतीय रेलची मुद्रा असलेले बनावट जाॅईनिंग लेटर त्यांना देऊन फसवणुक करण्यात आली आहे. याव्यतिरिक बऱ्याच लाेकांना पुणे रेल्वे स्टेशन येथील आर.एम.एस सेक्शन याठिकाणी नाेकरीस लावताे असे खाेटे अमिष दाखवून त्यांच्याकडूनही वेगवेगळया रक्कमा स्विकारुन आराेपींनी त्यांची फसवणुक केलेली आहे. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन वाघारे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...