आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील कुटुंबियांची फसवणूक:मुंबईत अलिशानमध्ये फ्लॅटचे आमिष दाखवून घातला अडीच कोटींचा गंडा

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील ओशियन हाईटस या बांधकाम प्रकल्पात अलिशान घर कमी पैशात देताे असे म्हणून विश्वास संपादन करुन पुण्यातील एका कुटुंबाची अडीच काेटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमरजित जितेंद्र शुक्ला (वय-38,रा.जाेगेश्वरी, मुंबई) या आराेपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत काेथरुड पोलिस ठाण्यात मंगल नागनाथ परकाळे (वय-45,रा.काेथरुड,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 13/9/2022 ते 2/3/2023 यादरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी अमरजित शुक्ला याने तक्रारदार मंगल परकाळे यांना मुंबईतील ओशियन हाईटस नावाचे प्राेजेक्ट मधील फ्लॅट कमी पैशात देताे असे सांगितले हाेते. त्याप्रकारे त्याने विश्वास संपादित करत फ्लॅट मध्ये दाेन काेटी 55 लाख रुपये गुंतविण्यास सांगितले असता तक्रारदार यांनी पैसे गुंतवले. परंतु आराेपीच्या ओशियन हाईटस येथील फ्लॅटवर दुसऱ्या बँकेचे कर्ज असल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आले.

त्यामुळे त्यांनी आराेपीस पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, आराेपीने पैसे परत न करता त्याची 40 लाख रुपये किंमतीची रेंन्ज राेवर गाडी (एमएच 02 ईएक्स 0123 ही शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन देण्याचे सांगितले. त्याकरिता टी.टी.फाॅर्मवर सहया देवून डिसेंबर 2022 मध्ये पुणे आरटीओ येथे तक्रारदार यांचे नावे रजिस्ट्रेशन झाले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे पती नागनाथ परकाळे यांनी आराेपीस गाडी ताब्यात देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांना आराेपीने ‘गाडी मी तुला देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’ असे सांगुन तक्रारदार यांचे नावे मालकी हक्क रजिस्ट्रेशन झालेली गाडी त्यांना देण्यास नकार न देता फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास काेथरुड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस माळी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...