आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात व्यवसाय करण्याचे दाखवले आमिष:व्यावसायिकाची 37 लाखांची फसवणूक; पुण्यातील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात सूर्यफुलाचे तेल विक्री करुन चांगल्याप्रकारे नफा मिळवू असे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिकाची 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी व्यावसायिक दिनेश तिलकचंद संचेती (वय-५३,रा.सातारा राेड,पुणे) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोेलिसांनी गुरुवारी (15 डिसेंबरला) दिली

नेमकं प्रकरण काय ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार पोलिसांनी जेसी तेरा, खुशबू दत्ता आणि फ्रॅक डेव्हीस या आराेपींवर आर्थिक फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2021 ते ऑगस्ट 2021 यादरम्यान घडला. तक्रारदार दिनेश संचेती यांची फेसबुकवरुन आराेपी जेसी सारा हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर या कालावधीत आराेपीने व्यवसायिकाशी वेळाेवेळी संर्पक साधून त्यांना इतर आराेपी साेबत संगनमत करुन हायड्राॅलिक अ‍ॅसिड एक्सट्राॅक्ट ऑईल (सुर्यफूल तेल) तक्रारदार यांचे कंपनीचे वतीने भारतात खरेदी करुन ते परदेशात पाठविण्यास सांगितले. त्याकरीता खुशबू दत्ता हिच्या बँक खात्यावर टप्पाटप्याने एकूण 37 लाख रुपये पाठविण्यास सांगितल्याने व्यवसायिकाने तशाप्रकारे पैसे भरले. परंतु त्यास काेणत्याही मालाची डिलेव्हरी न देता त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे.

विमानतळ परिसरात तीन घरात घरफाेडी

पुण्यातील लाेहगाव परिसरातील काेपर आळी व हरणतळे वस्ती या भागात चाेरटयांनी तीन घरात घरफाेडी करुन सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरी करुन नेला आहे. याप्रकरणी अज्ञात आराेपीवर विमानतळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

याबाबत पोलिसांकडे पांडुरंग बबन टाचताेडे (वय-35) यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना नऊ ते 14 डिसेंबर यादरम्यान घडलेली आहे. तक्रारदार हे कुटुंबा समवेत बाहेरगावी गेले असताना, त्यांनी राहते घराचे कुलुप लाॅक लावून बंद केले हाेते. परंतु अज्ञात आराेपीने त्यांचे घराचे सेफ्टी डाेअरचे कुलुप तसेच लाकडी दरवाजाचे लाॅक कशाचे तरी सहाय्याने ताेडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरुम मधील कपाटातील 105 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, 234 ग्रॅम चांदीचे दागिने असा दाेन लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरुन नेला. तर श्रवण कुमार शेशमणी यांचे घराून अशाचप्रकारे चोरट्यांनी तीन लाखांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. तसेच पुजा किशाेर विंचुरकर यांचे घरातून ही सव्वालाख रुपयांचे साेन्या चांदीचे दागिने, राेख रक्कम व सामान असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...