आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका ज्येष्ठ नागरिकास बांधकाम व्यावसायात भागीदारी करून त्याच्या मुलाच्या नावावर दोन कोटी साठ लाख रुपयांचे कर्ज घेऊन दोन जणांनी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बालकृष्ण अरोरा आणि शेष बाळकृष्ण अरोरा (वय- 36 ,दोघे राहणार -साधू वासवानी चौक ,कॅम्प, पुणे) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.शेष अरोरा यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत रणजीतसिंग नंदलाल हुडा (वय- 66, राहणार -घोरपडी ,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2019 ते आत्तापर्यंत घडलेला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,संबंधित आरोपी बालकृष्ण अरोरा आणि शेषराव यांनी संगणमत करून तक्रारदार रणजितसिंग हुडा यांची आर्थिक लुटमार करण्याचे उद्देशाने त्यांच्या वृंदावन रिटेलर्स फर्ममध्ये भागीदारी केली.
संबंधित फर्मच्या साईटची बांधकामे बंद पाडून शिल्लक राहिलेल्या सदनिका व दुकाने विक्री करण्यापासून अडथळा निर्माण केला. तसेच तक्रारदार हुडा व त्यांच्या मुलास विश्वासात घेऊन तक्रारदार यांच्या मुलाच्या आर्क इंटिरियर सोल्युशन या कंपनीमधून आरोपींनी दोन कोटी साठ लाख रुपये कर्ज घेऊन, सदर कर्जाचे हप्ते न भरता फसवणूक केली.
तसेच सदर बांधकाम सुरू करण्याच्या बदल्यांमध्ये खंडणी स्वरूपात पैशाची व सदानिकांची मागणी केली आहे. याबाबत सीआरपीसी 153 अन्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस उसगावकर याबाबत पुढील तपास करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.