आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:जेजुरीत मित्रानेच किरकोळ कारणावरून केली मित्राची हत्या; मृतदेह फेकला तलावात

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 फूट खोल पाण्यातून गळाने काढला मृतदेह

पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरातून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राचा खून केला. तसेच या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला. प्रसाद मल्हार दळवी (४१) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांना जेजुरीतील होळकर तलावावर वादावादी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तलावाच्या किनाऱ्यावर रक्ताने माखलेला दगड दिसला तसेच रस्त्याच्या कडेला एक दुचाकी होती.

दुचाकीविषयी अधिक माहिती घेतली असता प्रसाद दळवी यांच्या मालकीची असल्याचे समजले. पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवत २० फूट खोल पाण्यातून गळाच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले. घटनेच्या रात्री मृत प्रसाद सोबत असणाऱ्या व्यक्तींची नावे पोलिसांना समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...