आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट:एका महिलेचा मृत्यू, घराची भिंत कोसळल्याने 8 जण जखमी

पुणे | प्रतिनिधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक नागरी असलेले चाकण बुधवारी रात्री सिलिंडर स्फोटाने हादरले. येथील राणूबाईमळा परिसरातील एका दुमजली इमारतीत सिलेंडरचा स्फोट झाला. यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

स्फोटामुळे घराची भिंत कोसळल्याने 8 जण जखमी झाले. ही घटना रात्री साडे आठच्या सुमारास घडली. जखमींना ताडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भाडेकरू जखमी

चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय 75) असे या सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर, लक्ष्मीबाई बिरदवडे (वय 78), तुकाराम परशुराम बिरदवडे, संगीता सुरेश बिरदवडे (वय 40), अक्षय सुरेश बिरदवडे (वय 18), वैष्णवी ऊर्फ ताई सुरेश बिरदवडे (वय 20) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर अन्य भाडेकरूदेखील यात जखमी झाले आहेत.

घराची भिंत कोसळली

पोलिस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रानुबाईचा मळा या ठिकाणी भाऊ परशुराम बिरदवडे यांचे मोठे घर आहे. काल रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. स्फोट एवढा भयंकर होता की, यामुळे घराची भिंत कोसळली. यामुळे तब्बल 8 जण जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दखल झाले. रात्री, उशिरापर्यंत घटनास्थळी मदतकार्य सुरू होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे.

परिसर दणाणला

सिलेंडरमधून गळती झाल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. स्फोट एवढा भीषण होता की, त्याच्या आवाजाने आसपासचा परिसर दणाणला. परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...