आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस चौकीत महिलांचा राडा:घोरपडी चौकीत अंमलदाराला मारण्यासाठी धावल्या; 4 जणींविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घोरपडी पोलीस चौकीत बेकायदेशीर जमाव जमवून अंमलदाराला मारण्यासाठी अंगावर धावून जात महिलांनी राडा घातला आहे. याप्रकरणी चार महिला विरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

याबाबत पोलीस अमलदार तुळशीराम रासकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय दिलीप सरदार (वय -२३ रा. मिलींदनगर,घोरपडी,पुणे ) याला अटक केली आहे. चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुळशीराम रासकर हे ११ मे रोजी घोरपडी पोलीस चौकीत कर्तव्यावर होते. त्यावेळी अदखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने तरुणाला नोटीस बजावित होते. त्यावेळी महिलांना बेकायदेशिररित्या जमाव जमवून रासकर यांच्या अंगावर धावून जात अपशब्द वापरले. विनयभंगाचा गुन्हा दाखल करते, अशी धमकी महिलांनी दिली. संबंधित टोळक्याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार पुढील तपास करीत आहेत.

महिलेचे दोन लाखांचे गंठण हिसकाविले

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन त्यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेले. ही घटना १० मे रोजी रात्री अकराच्या सुमारास आंबेगाव ब्रदूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्षा शेटे (वय -३७, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षां मूळच्या घाटकोपरमधील असून १० मे रोजी रात्री अकराच्या सुमारास आंबेगाव परिसरात थांबल्या होत्या. रस्त्याने पायी जात असताना दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन गळ्यातील १ लाख ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पुढील तपास करीत आहेत.