आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांच्या चिमुरडीने चोराला पिटाळले:आजीची सोनसाखळी हिसकावणाऱ्याला नातीने बदडले, VIDEO व्हायरल

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजीच्या गळ्यातील साखळीचोरीचा प्रयत्न 10 वर्षांच्या नातीने उधळून लावल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. भर दिवसा गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दुचाकीवरून आला चोर

याविषयी सविस्तर वृत्त असे की, पुण्याच्या शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये राहणार्‍या लता वाघ या गुरूवारी संध्याकाळी त्यांच्या दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी 25 ते 30 वयाचा एक तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या आजीला पत्ता विचारला. त्यावर आजी पत्ता सांगत असताना चोरट्याने आजूबाजूला पाहत आजीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

10 वर्षीय ऋत्वीचे धाडस

यावेळी लता वाघ यांनी चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यापासून 5 फुटांच्या अंतरावर असलेल्या दहा वर्षीय ऋत्वी वाघ हिने हातातील बॅगने चोराच्या तोंडावर मारण्यास सुरुवात केली. चोराने आधी प्रतिकार करत दागिने ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजींसह नातीनेही चोरावर हल्ला चढवल्याने चोर भांबावला आणि त्याने दागिने न चोरताच पळ काढला. या प्रकारानंतर 10 वर्षांच्या ऋत्वीच्या धाडसाचं चांगलंच कौतुक होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हा नोंद

दरम्यान, ही घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गुरुवारी 9 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही बातमीही वाचा...

विनयभंग:75 वर्षीय महिलेचा शिवीगाळ व धक्काबुक्की करत विनयभंग

बातम्या आणखी आहेत...