आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:पुण्यात गोदामाला भीषण आग, होरपळून 3 कामगारांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरात मध्यरात्री वाघोली येथील एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री ही आग लागली होती. या गोदामाच्या शेजारी ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतू अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे पुढील अनर्थ टळला.

पुण्यातच दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये बॅंकेला आग लागली. यात महत्वाची कागदपत्रे जळाल्याची माहिती आहे.

गोदामात अग्नितांडव

पुण्यातील वाघोली भागात असणाऱ्या एका गोदामाला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास उबाळे नगर येथे आग लागली. शुभ सजावट या मंडपाचे साहित्य असणारे हे गोदाम होते. या आगीत गोदामातील 4 सिलेंडर फुटले. आगीनंतर त्वरीत अग्निशमन दलाच्या 5 तर पीएमआरडीए 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. परंतू या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

400 सिलेंडरने भरलेला साठा

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.परंतू या गोदामाच्या शेजारी 400 सिलेंडरने भरलेला साठा होता. आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आल्याने पुढील धोका टळला. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच 400 सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.”