आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण हत्या:पुण्यात सराईत गुंडाचा दगडाने ठेचून खून, 8 ते 9 जणांनी केला हल्ला, नुकताच येरवडा कारागृहातून आला होता बाहेर

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वानवडी भागात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 8 ते 9 जणांनी लाकडी दांडके व दगडाने ठेचून या गुन्हेगाराची काल रात्री उशीरा हत्या केली. सनी हिवाळे असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर या घटनेत साहील इनामदार हा युवकदेखील जखमी झाला आहे. हिवाळे हा सराईत गुन्हेगार असून गेल्या 9 एप्रिललाच तो मोक्काच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून बाहेर आला आहे.

गुंडाची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र पुर्ववैमन्यस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाच पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, हत्या झालेला गुंड सनी हिवाळेविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.