आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात अत्यंत चर्चेत ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. अरुण लाड यांनी भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला. विजयासाठी 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होते. लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली.
दरम्यान अरुण लाड मतमोजणी सुरु झाल्यापासून आघाडीवर होते. अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. आता अंतिम निकाल समोर आले आहेत. अरुण लाड यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटलांनी भाजपच्या पाटलांना पराभूत केले, असे म्हटले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.