आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्ही बाधित पतीकडून विभक्त पत्नीवर चाकूने हल्ला:शरीर सुखाची मागणी करत धारदार शस्त्राने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयव्ही बाधित असलेल्या साेलापूर जिल्हयातील माढा परिसरातील एका 36 वर्षीय पतीने पत्नी शारिरिक सुख देत नसल्याचे कारणावरुन पुण्यातील बिबवेवाडी परिसरात येऊन, 27 वर्षीय पत्नीवर चाकुने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत पत्नी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय आराेपी पती विराेधात पत्नीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. सदरचा प्रकार 23 जानेवारी राेजी घडला आहे. तक्रारदार 27 वर्षीय महिला ही आराेपीची पत्नी आहे. लग्नानंतर पतीस एचआयव्ही असल्याचे समजल्यानंतर, पत्नी पुण्यात माहेरी येऊन विभक्त राहत हाेती. परंतु पतीने त्यानंतर ही तो पत्नीस सतत फोन करून संपर्क साधत होता. पत्नी शारिरिक सुख देत नसल्याचे आणि त्याचे बराेबर नांदत नसल्याचा राग मनात धरुन त्याचेकडील चाकुने पत्नीचे शरीरावर चाकुने हल्ला करुन तिला जखमी करुन शिवीगाळ करुन पसार झाला आहे. याबाबतचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस गादिलवाड करत आहे.

बहिणीकडून बहिणीचा विनयभंग

पुण्यातील विमाननगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 18 वर्षीय तरुणी राहते घरात हाॅल मध्ये झाेपलेली असताना, तिच्या घरी आलेल्या एका नात्यातील बहिणीने तिचे जवळ येऊन तिच्या शरीरावरुन हात फिरवत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी पिडितेने तक्रार दाखल केल्यानंतर, 24 वर्षीय तरुणीवर याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 22 जानेवारी राेजी रात्री साडेअकरा वाजता घडल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...