आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरकाम करीत असताना मोलकरणीने सोन्याचे दागिने आणि ४० हजारांची रोकड असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना जानेवारी ते ७ एप्रिलला बालेवाडीतील चैतन्य प्लॅटिनम सोसायटीत घडली. याप्रकरणी महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटूंबियासह बालेवाडीतील चैतन्य प्लॅटिनम सोसायटीत राहायला आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या घरामध्ये मोलकरीण काम करीत होती. १३ जानेवारी ते ७ एप्रिल कालावधीत तिने घरमालकीने महिलेची नजर चुकवून घरातील ४० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणाची माहिती फिर्यादीला लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.
गैरसमजुतीतून तरुणावर वार
दोन गटात सुरु असलेल्या भांडणामुळे घाबरुन पळून जाणार्या तरुणाला दोघांना अडविले. त्याने भांडण सोडविल्याचा गैरजसमज झाल्यामुळे दोघांनी तरुणावर वार करुन गंभीररित्या जखमी केले. ही घटना ७ एप्रिलला रात्री आठच्या सुमारास लोहगावमध्ये घडली.याप्रकरणी अमितकुमार विश्वकर्मा (वय २१ रा. लोहगाव) याने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकुमार हा ७ एप्रिलला वडगाव शिंदे परिसरातून जात होता. त्यावेळी त्याठिकाणी चार ते पाचजण भांडण करीत होते. त्यामुळे अमितकुमार घाबरुन पळून जाउ लागल्याने दोघांनी अमितकुमारचा पाठलाग करुन अडविले. त्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याच्या गैरसमजुतीतून दोघांनी त्याला मारहाण करून वार करीत जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.