आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune : Husband Angry With Wife's Ax In Pimpri Chinchwad Several Times With Ax On Sister In Law, Gambhir Recently Admitted To Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:पत्नी माहेरी गेल्यामुळे पती झाला नाराज, रागाच्या भरात मेहुणीवर केले कुऱ्हाडीने वार; पिंपरी चिंडवड परिसरातील घटना

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेहुणीच्या डोके, उजवा हात आणि मानेवर गंभीर जखमा, आरोपी फरार

पत्नी माहेरी गेल्यामुळे नाराज झालेल्या पतीने मेहुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीने कुऱ्हाडीने मेहुणीवर अनेक वार केले. सध्या ती रुग्णालयात दाखल असून मृत्यूशी झुंझत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचडव परिसरातील चिखली भागात ही घटना घडली.

आरोपी विनोद हिरामन चव्हाण (35) पुणे पोलिसात कार्यरत आहे. या घटनेनंतर त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला. या हल्ल्यातील जखमी सिंधू पुंडलिक मोहिते (26) हिच्यावर पिंपरीतील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी विनोद हिरामन चव्हाण पुणे पोलिसात कार्यरत आहे
आरोपी विनोद हिरामन चव्हाण पुणे पोलिसात कार्यरत आहे

आधी मेहुणीशी घातला वाद नंतर कुऱ्हाडीने केले वार

विनोद आणि त्याच्या पत्नीत अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादामुळे पत्नी मुक्ता बुधवारी आपल्या माहेरी देहुगाव येथे गेली होती. विनोद संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याला पत्नी घरात दिसली नाही. त्याने तात्काळ सासर गाठले आणि तेथे मेहुणीसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने विनोदने तिच्यावर कुऱ्हाडीने अनेक वार केले.

या हल्ल्यात सिंधूच्या डोके, उजवा हात आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या. याप्रकरणी मुक्ताने पोलिसांत पतीविरोधत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी एक पथक गठित केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एसएस उबाळे करत आहेत.