आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय रेल्वेत काही विभागात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी पदाेन्नती आरक्षण लागू करण्यात आले आहे. परंतु मध्य रेल्वेत ते अद्याप लागू करण्यात आलेले नाही. पदाेन्नती आरक्षण हे मध्य रेल्वेत लागू करण्यात यावे नाही तर ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असाेसिएशन तर्फे मुंबईतील मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांचे कार्यालयावर प्रचंड संख्येने माेर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आल्याची माहिती असाेसिएशनचे झाेनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे यांनी बुधवारी दिला आहे.
पुण्यात ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असाेसिएशनची मध्य रेल्वे झाेनलची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी झाेनल सचिव सतिश केदारे, झाेनल कार्यकारणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, हेमंत गाधले (मुंबई), साेलापूर मंडळ अध्यक्ष सचिन बनसाेडे, संजय तपासे (सानपाडा), मुंबई मंडळ महिला अध्यक्ष माधुरी पडळकर, सुचित्रा गांगुर्डे (नाशिक), अशाेक सुरवाडे (भायखळा), राजेश थाेरात (मुंबई, नितीन वानखेडे (पुणे) आदी उपस्थित हाेते. या कार्यक्रमाचे आयाेजन पुणे मंडलचे सचिव नितीन वानखेडे, कार्याध्यक्ष विशाल ओहाेळ आणि अति.सचिव दिनेश कांबळे, विश्वजीत कीर्तीकर यांनी केले.
सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव संमत करण्यात आले की, झाेनल व मंडळ कार्यकारणी सदस्यपदी सेवानिवृत्त कर्मचारी यांना झाेनल व मंडल कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येऊ नये, भुसावळ येथे जी झाेनलची बैठक झाली ती बैठक बेकायदेशीर हाेती. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयाचे खंडन करण्यात आले. बी.के.खाेइया, हेमंत जाधव, अशाेक खरे, टी.व्ही. वाघमारे यांचे असाेसिएशनचे प्राथमिक सदस्य नसल्याचे यावेळी घाेषित करण्यात आले. झाेनल सचिव सतिश केदारे यांनी सन 2022-23 चा झाेनल सचिवांचा अहवाल यावेळी सादर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.