आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक:कमाईची अशीही स्पर्धा : सासू पापड बनवण्यात, तर सुना केकमध्ये व्यग्र

पुणे ( मनीषा भल्ला )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजमाता पापड केंद्रात काम करताना गटाच्या महिला. त्यांचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयांपर्यंत गेले आहे. छायाचित्र : ताराचंद गवारिया. - Divya Marathi
राजमाता पापड केंद्रात काम करताना गटाच्या महिला. त्यांचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयांपर्यंत गेले आहे. छायाचित्र : ताराचंद गवारिया.
  • पुण्यातील इंदापूर गावात महिलांमध्ये स्पर्धा

बारामतीपासून २८ किलोमीटर लांब गाव आहे इंदापूर. गावातील सासू व सुनांमध्ये कमावण्याची अनोखी स्पर्धा सुरू आहे. येथे आधीपासूनच महिलांचा स्वयंसहायता गट आहे. जे उडदाचे पापड बनवण्याची कामे करतात. परिसरात त्यांच्या पापडांना एवढी मागणी आहे की, एक महिन्यात ४०० किलोपर्यंत पापड जवळच्या शारदानगर महाविद्यालयाच्या मेसमध्ये विकले जातात. गटातील सातही महिला वयस्कर आहेत. त्यांना कमावताना बघून आता गावातील सुनांनाही एक गट बनवला आहे. तो चॉकलेट आणि केक बनवतोय. सासूंचे म्हणणे आहे की, सुनांनी कोणताही फॅशनेबल पदार्थ बनवला तरी आमचीच कमाई जास्त राहील.

आठवड्यातील तीन दिवस काम केल्यास पापड बनवणाऱ्या सात महिला वर्षभरात एकूण सात लाख रुपये कमावतात. त्यांनी राजमाता पापड केंद्र बनवले आहे, तर सुनांनी स्वामी समर्थ नावाने गट बनवला आहे. त्यांचे समन्वयक आणि गावातच राहणारे राहुद गुरुजी सांगतात, कोणाचा गट किती पैसे कमावतो यावरून सासू-सुनांमध्ये स्पर्धा सुरू आहे, जी चांगली गोष्ट आहे. गावातील सासू आणि सुनांना भांडण्यासाठी आणि एक दुसऱ्याची चुगली करण्यास वेळच मिळू नये असे आम्हाला वाटते. महामारीच्या काळात पुरुषांकडे कोणतेच काम नव्हते तेव्हा महिलांनीच पूर्ण घराचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. शारदा महिला संघ अंतर्गत बनवण्यात आलेल्या या गटाचे समन्वयक राजाराम नागरे सांगतात की, बारामतीत या प्रकारचे २०० गट आहेत, जे काहीना काही तरी बनवत आहेत आणि स्वत: मार्केटिंगही करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...