आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव:नवे वेळापत्रक जाहीर, महोत्सव संचालक डाॅ. जब्बार पटेल यांची माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता नव्या वेळापत्रकासह रसिकांसमोर येणार आहे. २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पिफ आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावर्षी महोत्सवासाठी ७२ देशांमधून १५७४ इतके चित्रपट आले असून त्यापैकी १४० चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते यावेळी उपस्थित होते.

यंदा महोत्सव ऑफलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ५ जानेवारी रोजी www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया १९ जानेवारी पासून सुरू होणार आहे.

  • महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ५ जानेवारी तर स्पॉट नोंदणी १९ जानेवारी पासून सुरू,
  • जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांचीही घोषणा
  • पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे होणार महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन

महोत्सवात दाखविण्यात येणारे सर्व चित्रपट हे ‘ए प्लस ग्रेड’चेच आहेत असे सांगत डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “यावर्षी जानेवारी महिन्यात नियोजित असलेला महोत्सव आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देत फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे ठरविले आहे. आधीच्या तारखांदरम्यान जी २० परिषद संबंधी बैठका या पुण्यात होणार होत्या. या दरम्यान सेनापती बापट रस्त्यांवरील पॅव्हेलियन मॉलमध्ये महोत्सवाच्या ६ स्क्रीन्स होत्या. या ठिकाणी प्रशासनावरील ताण आणखी वाढू नये म्हणून आम्ही प्रशासनाच्या विनंतीचा स्वीकार करीत तारखा पुढे ढकलल्या.”

  • जागतिक स्पर्धा विभागातील १४ चित्रपटांची घोषणा
  • पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे होणार महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन
  • मराठी स्पर्धा विभागात ७ चित्रपट
बातम्या आणखी आहेत...