आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल:यंदाच्या ‘पिफ’मध्ये विद्या बालनचा सहभाग

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदनशील अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणारी विद्या बालन आणि ती मांडणार असलेले विचार, हे यंदाच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे (पिफ) वैशिष्ट्य आहे. ८ फेब्रुवारी रोजी विद्या बालन ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दि एन्टरटेन्मेन्ट वर्ल्ड ‘ या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहे, अशी माहिती ‘पिफ’चे संचालक जब्बार पटेल यांनी सोमवारी दिली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादीही जाहीर करण्यात आली. विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत या वर्षी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचे ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आलेे.

बातम्या आणखी आहेत...