आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल ६ लाखांचे १८ कॅरेट गोल्डपासून बनवलेले ५ तोळ्यांचे चमचमते बाॅलपेन...दुबई शहर साकारलेले संपूर्ण चांदीचे पेन...जगभरात मोजक्याच संख्येत असलेले शुद्ध चांदीपासून बनवलेले अडीच लाखांचे पेन....जॅपनीज झाडांपासून बनवलेले आणि सोने तसेच प्लॅटिनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेले उरुशी पेन...सोन्याची निब असलेले दीड लाखांचे डिप्लोमॅट पेन त्यासोबतच सुगंधी शाई, सोन्याची पावडर असलेली शाई असे पेन आणि शाईचे विविध प्रकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
पुण्यामध्ये इंटरनॅशनल पेन फेस्टिव्हलचे आयोजन आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे व्हीनस ट्रेडर्सतर्फे करण्यात आले आहे. फेस्टिव्हलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, फ्लेअर पेनचे अध्यक्ष खुबीलाल राठोड, कुमार प्रॉपर्टीजचे केवलकुमार जैन, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे, पीएनजीचे सौरभ गाडगीळ, सुरेंद्र करमचंदानी आदी उपस्थित होते.
सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, आजच्या डिजिटल युगात फाउंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाउंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदीदेखील करता येणार आहेत. दिनांक १२ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे पेन फेस्टिव्हल सुरू असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.
२०० रुपयांपासून ६ लाखांपर्यंत किमती
या प्रदर्शनात जगद्विख्यात ब्रँड्सचे तब्बल दोन हजारांपेक्षा अधिक पेन्स प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फेस्टिव्हलमध्ये २०० रुपयांपासून ते ६ लाख रुपये किमतीचे पेन असून फाउंटन पेन, बॉलपेन, रोलर पेन, मल्टिफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन, यांत्रिक पेन्सिल, शाईचे विविध ५०० श्रेणीतील पेन आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.