आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 हजार 218 प्रकरणे निकाली:राष्ट्रीय लाेक अदालतमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे राज्यात प्रथम

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळया प्रकाराचे न्यायालयात पाेहचलेले वाद सामंजस्याने चर्चेच्या माध्यमातून समाेपचाराने सुटावेत यासाठी लाेकअदालत कार्यरत आहे. विधी सेवा प्राधिकरण मार्फत लाेकअदालतीचे आयाेजन करण्यात येते. मागील 3 वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे निकाली काढत महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला.

नुकतेच 13 ऑगस्टला राष्ट्रीय लाेक अदालत झाली. यात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फेत एकूण 25 हजार 218 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील एकूण 14 हजार 514 निकाली झालेली प्रलंबित प्रकरणे ही इतर सर्व जिल्ह्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव एम.डी.कश्यप यांनी मंगळवारी दिली.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर लाेकन्यायालयांचे आयाेजन करण्यात आले हाेते. राष्ट्रीय विधी सेवा प्रधिकरणाचे निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी लाेकअदालतीचे नियाेजन करण्यात येते. त्यामुळे एकाच दिवशी देशातील विविध न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे माेठ्या प्रमाणात निकाली निघाल्यामुळे न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणाचा असलेला ताण कमी हाेण्यास मदत हाेते.

लाेकअदालतमुळे दाेन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत हाेते. लाेकन्यायालयात प्रकरण मिटले तर त्यात अपील करता येत नाही. लाेकन्यायालयात न्यायालयात प्रलंबित असलेली तसेच दाखलपूर्व प्रकरणेही सामंजस्याने मिटविण्यासाठी ठेवण्यात येतात.

ज्येष्ठ जाेडप्याचे पुन्हा मिलन

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी दिन आणि वयाच्या अमृत महाेत्सवी वर्षात पर्दापण केलेल्या जाेडप्याचे तडजाेडीमुळे एकत्र नांदणेस जाण्याचा दुग्ध शर्करायाेग लाेकअदालतमुळे शक्य झाला अाहे. लाेक न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशिला पाटील यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या काैटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंर्तगत दाखल प्रकरण तडजाेडीकरिता ठेवण्यात अाले हाेते. सदर प्रकरणातील पत्नीने वयाच्या 75 व्या वर्षात पर्दापण केले हाेते व त्यांनी आपल्या पतीविरुध्द केस दाखल केली हाेती. लाेकन्यायालयात दाेन्ही पक्षकार आपापल्या वकीलांसाेबत उपस्थित राहिले. पाटील यांनी याप्रकरणात सांमजस्याने तडजाेड घडवून आणली व सदर पत्नीला त्यांचे पतीने त्यांचे घरी नांदायला नेण्यास तयार केले. अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिक जाेडपे पुन्हा एकत्रित आले.

आगामी लाेकअदालत 12 नाेव्हेंबरला

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फेत घेण्यात आलेल्या सात राष्ट्रीय लाेकअदालतीत एकूण सात लाखांपेक्षा जास्त दाखल असलेली व दाखलपुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मंगल कश्यप यांनी दिली आहे. यापुढील राष्ट्रीय लाेकअदालत 12 नाेव्हेंबरला आयाेजित करण्यात येणार आहे. या लाेकन्यायालयात अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी हाेवून आपली प्रकरणे तडजाेडीने निकाली करुन घ्यावीत असे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...