आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे तेथे काय उणे..:देशातील दोन नंबरचे सर्वात सुरक्षित शहर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देशामध्ये पुणे दोन क्रमांकाचे शहर असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत टोळ्यांविरुद्ध केलेल्या मोक्का कारवाया, एमपीडीएनुसार स्थानबद्धता, रायझिंग गँगचा बीमोड, अल्पवयीन गुन्हेगारांच्या समुपदेशनामुळे गुन्हेगारीला आळा बसला आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार २०२१ मध्ये पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर ठरले आहे. या अहवालानुसार कोलकाता हे सर्वात सुरक्षित शहर असून तेथे दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी प्रति एक लाख लोकसंख्येमागे १०३.४ आहे, तर पुण्यात गुन्ह्यांची संख्या (२५६.८) आहे. तिसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर म्हणून हैदराबादने गौरव प्राप्त केला असून त्या ठिकाणी गुन्ह्यांची संख्या (२५९.९) एवढी आहे. पुण्यात महिला सुरक्षिततेसह कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम फायदेशीर ठरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...