आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नियुक्ती पत्र:पुणे महापालिकेत नाेकरी लावण्याचे अमिष; तिघांची 16 लाखांची फसवणूक

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महानगरपालिकेत तीन तरुणांना नाेकरीस लावून देताे असे सांगून भामटयांनी त्यांची 16 लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काेथरुड पाेलिस ठाण्यात ओम विनायक मेमाने (वय-24,रा.पुणे) यांनी पाेलिसांकडे आराेपींविराेधात तक्रार सोमवारी दाखल केली आहे.

गुन्हा दाखल

याबाबत पाेलिसांनी आराेपी अशिष उबाळे, संदीप उदमले व यवशाेब देवकुळे (रा.पुणे) यांचे विराेधात भादवि कलम 420,465,467,471,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार 3/11/2020 ते 4/1/2022 यादरम्यान गुजरात काॅलनी,काेथरुड याठिकाणी घडला आहे. ओम मेमाने व त्यांचे दाेन मित्र शरद शिंदे व मयुर पवार यांना महानगरपालिकेत नाेकरीस लावताे असे अमिष आराेपींनी संगनमत करुन सांगितले. त्याकरिता त्यांचेकडून एकूण 16 लाख दहा हजार रुपये घेऊन तिघांना उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नावाचे प्रत्येकी तीन बनावट नियुक्ती पत्र आराेपींनी दिली.

नोकरीचे आमिष

मात्र, सदर नियुक्तीपत्र घेऊन ते मनपात चाैकशीसाठी गेले असता, तीनही नियुक्ती पत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तीन भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ओम मेमाने हे पुणे महापालिकेत सध्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करत असून, त्यातूनच त्यांची आरोपी सोबत ओळख निर्माण झाली होती. आरोपींनी त्यांची आणि त्यांच्या दोन मित्रांची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी माहिती तपास पथकाचे पोलिस निरीक्षक सागर सावळे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...