आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीएमध्ये नाेकरी लावून देतो म्हणत 28 लाखांचा गंडा:इलेक्ट्रिक टेंडर मिळवून देण्याचा केला बहाणा, आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी (एनडीए) मध्ये कायमस्वरुपी नाेकरी लावून देताे तसेच एनडीएतील इलेक्ट्रीक वर्क टेंडर मिळवून देण्याच्या अमिषाने एका इसमाला भामटयांनी 28 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे.

प्रसाद गाेविंद वझे (रा.काेंढवे धावडे, उत्तमनगर,पुणे) व परमेश्वर अंकुश शिंदे (रा.सिंहगड राेड,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात विजय याेगीराज साखरे (वय 42,रा.नऱ्हे,पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार मे 2022 ते 15 ऑक्टोबर 2022 यादरम्यान घडलेला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय साखरे यांचे ओळखीचे आराेपी प्रसाद वझे व परमेश्वर शिंदे यांनी आपसात संगनमत करुन तक्रारदार यांचे पत्नी व त्यांचे नातेवाईक यांनी एनडीए मध्ये कायमस्वरुपी नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवले. तसेच एनडीए मधील इलेक्ट्रीक वर्क टेंडर मिळवून देताे असे सांगुन तक्रारदार यांचेकडून ऑनलाइन व राेख स्वरुपात वेळाेवेळी एकूण 28 लाख रुपये घेण्यात आले.

परंतु त्यांचे पत्नी किंवा नातेवाईकांना नाेकरीस न लावता किंवा इलेक्ट्रीक टेंडरची ऑर्डर मिळवून न देता आणि दिलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक व्ही. जाधव करत आहे.

अनैतिक संबंध असल्याचे संशयातून ताेडफाेड

काेथरुड परिसरातील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका इसमाचे पत्नीचे घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचे संशयावरुन, संबंधित इसमाने धारदार शस्त्र हातात घेऊन तरुणाच्या घरात शिरुन कुटुंबातील व्यक्तींना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत घरातील टीव्ही, फ्रीज, खिडकीच्या काचा यांची ताेडफाेड केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरुणाच्या 57 वर्षीय आईने आराेपी विराेधात काेथरुड पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...