आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचे अपहरण:300 कोटींच्या बिटकॉइनसाठी तरुणाचे अपहरण, 8 जण अटकेत; पिंपरीतील घटना

पिंपरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका व्यक्तीकडे ३०० कोटी रुपयांचे बिटकॉइन (क्रिप्टो करन्सी) असल्याचा समज करून सायबर शाखेत कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याने योजना आखून एकाचे अपहरण केले. अपहृताला कोकणात नेले. मात्र पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच त्याला तेथेच सोडून दिले. वाकड पोलिसांनी या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यासह आठ जणांना अटक केली आहे.

विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) असे अपहरण व सुटका झालेल्याचे नाव आहे. तर पोलिस कर्मचारी दिलीप खंदारे, सुनील राम शिंदे, वसंत चव्हाण, फ्रान्सिस डिसुझा, मयूर शिर्के, प्रदीप काटे, शिरीष खोत, संजय ऊर्फ निकी बन्सल आदी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस शिपाई दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे. तो पूर्वी पुणे शहर पोलिस दलाच्या सायबर विभागात कार्यरत होता. त्याला विनय नाईक यांच्याकडे ३०० कोटी रुपयांचे बिटकॉइन असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे विनय यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचा डाव खंदारेने रचला. १४ जानेवारीला ताथवडेतील हॉटेलमधून नाईक यांचे सात ते आठ अनोळखी जणांनी अपहरण केले. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी तत्काळ दोन पथके तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरू केले. पोलिस मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली अन् त्यांनी नाईक यांना तेथेच सोडून पळ काढला.

बातम्या आणखी आहेत...