आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 16 वर्षीय मुलाचे अपहरण करत काढले नग्न फोटो:चार अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल, जुन्या वादातून घडला प्रकार

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात 'भांडणातील मुलांची नावे सांग' असे म्हणत अल्पवयीन गुडांच्या टोळक्याने 16 वर्षीय मुलाचे अपहरण करत त्याला धमकावले व त्याचे नग्न करत फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आरोपींवर दत्तवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पीडित मुलाच्या 40 वर्षीय वडीलांनी पाेलिसांकडे आराेपी मुलांविराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना गुरूवारी (2 मार्च) दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शाहू काॅलेज परिसराजवळ घडला आहे.

नक्की काय घडले?

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी लक्ष्मीनगर परिसरातील शाहू काॅलेज जवळून पिडित मुलास आराेपींनी जबरदस्तीने गाडीवर वसवून साई सिध्दी चाैकापासून सुर्या चाैकात नेले. तेथून आंबेगाव तळजाई पठारावरील मोकळया मैदानात नेले व 'कालच्या भांडणातील मुलांना घेऊन ये' असे म्हणत धारदार शस्त्र गळयास लावले व खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली.पीडित मुलास नग्न करुन आरोपींनी त्याचे फाेटाे काढले.

घडलेला सर्व प्रकार मुलाने घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबियांना सांगितल्यावर याप्रकरणी दत्तवाडी पाेलिस ठाण्यात आराेपींविराेधात तक्रार दाखल करण्यात आली. पाेलिसांनी चारही अल्पवयीन आरोपींना नोटीस बजावली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस.कामे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...