आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिडे हाॅस्पिटलकडून म्हात्रे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचे कार मधून आलेल्या पाच ते सहा अनाेळखी व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री घडलेली आहे. बसवंत माधव गायकवाड (वय-25) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी शाेध घेत तरुणाची परभणी येथून सुटका झाल्याची माहिती साेमवारी दिली आहे.
याप्रकरणी बसवंत याचा मावस भाऊ शिवलिंग दिंगबर गायकवाड (वय-30,रा.चिंबळी, ता.खेड,पुणे) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनाेळखी पाच ते सहा जणां विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 11 मार्च राेजी रात्री पावणेअकरा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवंत गायकवाड हा जनक अभ्यासिकेतून घरी जात हाेता. त्यावेळी सेनादत्त चाैकातून उजवीकडे म्हात्रे पुलाकडे जात असताना, भिडे हाॅस्पिटलजवळ एक पांढऱ्या रंगाची ईरटिका गाडी आली. त्यातील पाच ते सहा अनाेळखी इसमांनी त्याचे अचानक ताेंड पकडून जबरदस्तीने त्याला गाडीत बसवून भिडे हाॅस्पिटल येथून यु-टर्न करुन सेना दत्त चाैकातून डावीकडे वळून शास्त्री राेडने टिळक चाैकाच्या दिशेने गेले. चारचाकी पांढऱ्या रंगाच्या गाडीत बसवंत यास जबरदस्तीने पळवून घेऊन गेल्याने आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आराेपींचा शाेध सुरु केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. कुंभार याबाबत पुढील तपास करत आहे.
अपहरणाचे कारण अस्पष्ट
संबंधित तरुण हा मुळचा नांदेड येथील रहिवासी असून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी आलेला हाेता. घटनेच्या दाेन दिवस आधीच ताे पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचे अचानक अपहरण करण्यात आल्याने पोलिसांनी त्याचा शाेध सुरु केला. पोलिसांच्या चाैकशीत त्यास अपहरण करणारी कार ही नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांची दाेन ते तीन पथके कार्यरत हाेऊन त्यांनी तरुणाची परभणी येथून सुटका झाल्याची माहिती दिली आहे. नेमके काेणत्या कारणास्तव त्याचे अपहरण करण्यात आले याचा अद्याप उलगडा झालेला नसून त्याबाबत पोलिस तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.