आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Kidnapping Case Updates: A Medical Professional For A Ransom Of Rs Five Lakh; Within Hours, The Police Hand Cuffed The Accused; News And Live Updates

खंडणी प्रकरण:पाच लाखाच्या खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; काही तासात पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

पिंपरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन आरोपी फरारी झाले असून त्यापैकी एकाला रात्री अटक केली.

‘आम्ही पोलिस असून, या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास 302 चा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल', अशी भीती दाखवून मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण करत; सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना वाकड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. ही घटना डांगे चौक, थेरगाव येथे मंगळवारी (ता. 15) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अशोक बेलिराम आगरवाल (53, रा. विकास नगर, किवळे) यांनी फिर्याद दिली. संबंधित प्रकरणात सिद्धार्थ भारत गायकवाड (32), प्रीतेश बबनराव लांडगे (30), राहुल छगन लोंढे (24), प्रकाश मधुकर सजगणे (31), कमलेश बाफना, संतोष ओव्हाळ व आकाश हारकरे (रा. सर्वजण वाकड) यांच्यावर अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी काही अनोळखी व्यक्ती आगरवाल यांच्या मेडिकलमध्ये घुसले. पोलीस असल्याचे सांगून त्यांनी कपाटातील एमटीपी कीट व दोन फायली घेतल्या. या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास 302 चा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल, अशी भीती दाखवीत जबरदस्तीने आगरवाल यांना त्यांच्या मोटारीत बसविले. आगरवाल व डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली व एक तासाच्या आत सहा लाख रुपये देण्याची मागणी केली.

या प्रकाराबाबत डॉ. खरे यांनी वाकड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन लावून विचारपूस केली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘आमचे असे कोणीही पोलिस आले नाहीत. त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक अशोक जगताप व विजय वेळापुरे यांना घटनास्थळी पाठविले. या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता डांगे चौक गाठले असता आरोपी त्यांना बघून पळू लागले. मात्र, त्यांनी पाठलाग करून पाच जणांना पकडत मोटारीत बसविलेल्या व्यावसायिकाची सुटका केली. दोन आरोपी फरारी झाले होते. त्यापैकी एकाला रात्री अटक केली.

बातम्या आणखी आहेत...