आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा16 वा ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 जानेवारीपासून सुरू होत आहे. या महोत्सवात यंदाचा 'वसुंधरा सन्मान' पाँडिचेरी येथील ऑरोविल येथील सॉलिट्यूड फार्म आणि ऑरगॅनिक किचनचे संस्थापक कृष्णा मॅकेंझी यांना, 'पर्यावरण पत्रकारीता' सन्मान गुजरात मधील भूज येथील अनुभवी पर्यावरण पत्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार रोनक गज्जर यांना, तर 'फिल्म मेकर' पुरस्कार डि. डब्ल्यु. इको इंडिया या पर्यावरणविषयक व्हिज्युअल (दृकश्राव्य) मॅगझीनला यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर यांनी दिली.
किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, महोत्सवाचे 'फॅसिलीटेटर' आनंद चितळे, 'क्यूरेटर' डॉ. गुरूदास नूलकर आणि 'महोत्सव संयोजक' वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विनामूल्य ऑनलाइन प्रसारित केला जाणार असून त्यासाठी bit.ly/kviff23 या लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा या विषयावर लक्ष केंद्रित करत आहे. महोत्सवामध्ये 100 पेक्षा जास्त फिल्म्स प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित करण्यात येणार असून ' एंचॅटिंग इंडिया' हा यंदाच्या छायाचित्र प्रदर्शनाचा विषय आहे.
दिव्य भास्करचे रोनक गज्जर यांना इकोजर्नालिस्ट सन्मान
गुजरात मधील भूज येथील अनुभवी पर्यावरण पत्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार रोनक गज्जर यांच्या कार्याचा गौरव इको जर्नालिस्ट सन्मानाने केला जाणार आहे. वन्यजीव, पर्यावरण आणि हवामान बदल याविषयी माहिती ते प्रसारित करतात.
त्यांची एक महत्त्वाची ब्रेकिंग स्टोरी म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड अर्थात माळढोक पक्ष्याचा शेवटचा नर गुजरातमधून कसा बेपत्ता झाला आणि राज्यात ग्रेट इंडियन बस्टर्ड्सच्या फक्त माद्या उरल्या ह्या बद्दलचा लेख. दोन वर्षांपासून त्यांचा, गुजराती भाषेमधला रविवारचा कुदरत नी केडी (निसर्गाच्या मार्गावर) हा पहिलाच असा वृत्तपत्रस्तंभ होता.
ज्याने वन्यजीवांबद्दलच्या गैरसमजुतींचा / मिथकांचा पर्दाफाश केला आणि बिबट्या, कॅराकल ( शशकर्ण) हा मार्जारकुलीन प्राणी, आणि हनीबॅजर (मध खाणारा बिज्जू) यांसारख्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणाचा संदेश प्रसारित केला. परिसंस्था आणि अन्नसाखळीतील त्यांचे महत्त्व आणि वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या कार्याचे यात मोठे योगदान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.