आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईला गेलेल्या कुटुंबियांच्या घरावर डल्ला:चोरट्यांनी लंपास केला 45 लाखांचा ऐवज, पुण्यातील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील काेथरुड परिसरातील एका कुटुंबियांच्या घरावर चोरट्यांना डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरील दाम्पत्य हे दुबईला त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला.

चाेरटयांनी दाेन लाख राेकडसह माैल्यवान साेन्याचे दागिने असा एकूण 43 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चाेरटयां विराेधात काेथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी साेमवारी दिली आहे.

याबाबत चंद्रशेखर केसरीनाथ चाैधरी (वय-79) यांनी आराेपी विराेधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार 13 ते 29 डिसेंबर काेथरुड परिसरात रामबाग काॅलनी येथरल शिवसाई केसरी अपार्टमेंट मध्ये घडला आहे. तक्रारदार चंद्रशेखर चाैधरी हे त्यांचे पत्नीसह काेथरुड मध्ये राहण्यास आहे. त्यांना दाेन मुली असून एक मुलगी पुण्यातच घराजवळ राहते तर दुसरी मुलगी दुबईत वास्तव्यास आहे.

तसेच कुटूंबिय मुलीला भेटण्याकरिता 12 डिसेंबर राेजी ते राहते घर कुलुप लावून बंद करुन दुबईला गेले हाेते. घरात काेणी नसल्याचा फायदा घेत, अज्ञात चाेरटयांनी यादरम्यान त्यांचे कुलुप बंद दरवाजा कशाचे तरी सहाय्याने ताेडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुम मधील लाॅकर ताेडून 32 लाख सहा हजार रुपये किंमतीचे साेन्याचे 952.618 ग्रॅम वजनाचे दागिने, सात लाख 11 हजार रुपयांचे हिऱ्याचे 17.751 कॅरेटचे दागिने व राेख दाेन लाख रुपये असा एकूण 41 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरी करुन नेला आहे. याप्रकरणी अद्याप चाेरटयांचा शाेध लागलेला नसून तपास करण्यात येत असल्याची माहिती काेथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...