आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वारगेट पाेलीस ठाण्याचे हद्दीत मिनाताई ठाकरे वसाहतीत भाईगिरीच्या वर्चस्व वादातून सचिन माने व त्याच्या टाेळीतील १० ते १५ गुंडानी हातात काेयते, कुऱ्हाडी, पालघन सारखी घातक शस्त्रे घेवून २६ फेब्रुवारी राेजी प्रतिस्पर्धी टाेळीतील प्रकाश पवार व त्याच्या चार ते पाच साथीदारांवर प्राणघातक हल्ला करुन जबर जखमी केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणात १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या नऊ आराेपींना स्वारगेट पाेलीसांनी जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अशाेक इंदलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सचिन परशुराम माने (वय-२४), विजय प्रमाेद डिखळे (२२), अमर तानाजी जाधव (२३), रमेश दशरथ मॅडम (२०), अजय प्रमाेद डिखळे (२४), राेहित मधुकर जाधव (२७), यश किसन माने (२१),आयुष किसन माने (२१) पल्या पासंगे (२१, सर्व रा.गुलटेकडी,पुणे), सुरज सतिश काकडे (२६,रा.महर्षीनगर,पुणे), निखील पेटकर (२२,रा.बिबवेवाडी,पुणे), अभिषेक पाटाेळे (२२,रा.पर्वती,पुणे), प्रमाेद एस (रा.पर्वती,पुणे) या आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नउ आराेपींना अटक करण्यात आले आहे.
मैत्रिणीस भेटण्यास आला अन् अडकला
सदर टाेळीतील मुख्य आराेपी सचिन माने गुन्हा केल्यापासून पसार झाला हाेता. पाेलीसांना वारंवार गुंगारा देऊन ताे राहण्याची ठिकाणी बदलत हाेता. घाेरपडी पेठ येथे ताे त्याच्या मैत्रिणीस भेटणार येणार असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलीस पथकाने त्याच्यावर पाळत ठेऊन पहाटे दाेन वाजता सचिन माने त्याची स्वत:ची आेळख लपवुन सदर ठिकाणी आल्यावर पाेलीसांनी झडप घालून त्यास कमरेला असलेल्या काेयतासह अटक केली. यावेळी काेयता शिताफीने काढताना पाेलीस अंमलदार शिवा गायकवाड हे जखमी झाले असून त्यांनी गायकवाड यास जागीच पकडून ठेवले.
यांनी केली कामगिरी
सदरची कामगिरी पाेलीस आयुक्त रितेश कुमार, सहपाेलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पाेलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, परिमंडळ दाेनच्या पाेलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली, वपाेनि अशाेक इंदलकर, पाेनि साेमनाथ जाधव, एपीआय प्रशांत संदे, पीएसआय अशाेक येवले, पाेलीस हवालदार मुकुंद तारु, पाेलीस अंमलदार शिवा गायकवाड, अनिस शेख, दिपक खेंदाड, सुजय पवार, साेमनाथ कांबळे, फिराेज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गाेडसे, संदीप घुले यांचे पथकाने केली आहे.
टाेळीवर माेक्का कारवाईसराईत गुन्हेगार सचिन माने (एस/एम कंपनी) याने स्वारगेट, सहकारनगर, मार्केटयार्ड परिसरात घातक शस्त्रांसह दराेडे, खुन, खुनाचे प्रयत्न, जबरी चाेऱ्या, खंडणी सारखे गंभीर गुन्हे केले असून त्याचेवर एकूण ११ गुन्हे दाखल आहे. एक वर्षाकरिता त्यास येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले हाेते परंतु त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत काेणती सुधारणा झाली नाही. त्याने पुन्हा टाेळी जमवुन साथीदारांसह गुन्हेगारी सुरु केल्याने सदर टाेळीवर नुकतेच माेक्का नुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.