आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:पुण्यातील दिलदार ऑटो ड्रायव्हर; लग्नासाठी जमा केलेल्या पैशातून गरिबांना पुरवतोय पोटभर जेवण

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 वर्षीय अक्षय कोठावलेचे 25 मे रोजी लग्न होते, पण आता होऊ शकणार नाही

लॉकडाउन-4 ची सुरुवात झाली आहे, पण आताही शेकडो मजुर रस्त्यावर उपाशी पोटी आयुष्य घालवत आहेत. अशा लोकांसाठी पुण्यातील एक ऑटो ड्रायव्हर दररोज जेवण्याची व्यवस्था करत आहे. ज्या पैशातून ऑटो ड्रायव्हर गरिबांना जेवण पुरवत आहे, ते पैसे त्याने आपल्या लग्नासाठी जमा केले होते. लॉकडाउनमुळे त्याचे लग्न कँसल झाल्यामुळे हे पैसे गरिबांचे पोट भरण्यासाठी खर्च करत आहे. 

लग्नासाठी जमा केले 2 लाख रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कोठावले (30) नावाच्या ऑटो ड्रायव्हरने आपल्या लग्नासाठी 2 लाख रुपये जमा केले होते. लॉकडाउनदरम्यान तो दररोज वृद्ध महिला आणि गरोदर महिलांना मोफत हॉस्पीटलपर्यंत पोहचवतो. या स्तुत्य उपक्रमाबद्दल अक्षयने सांगितले की, '25 मे रोजी माझे लग्न होणार होते. यासाठी मी दोन लाख रुपये जमा केले होते, पण लॉकडाउनमुळे मी आणि माझ्या होणाऱ्या बायकोने लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला.''

काही मित्रांनी केली अक्षयची मदत

अक्षयने पुढे सांगितले की, "मला रस्त्यावर असे लोक दिसले, ज्यांना एकवेळचे जेवणही मिळत नव्हते. जिवंत राहण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागत होता. यानंतर मी आणि माझ्या मित्रांनी त्यांना मदत करण्याचा विचार केला. मी माझ्या लग्नासाठी जमा केलेले पैसे यात वापरण्याचा विचार केला आणि यात माझ्या मित्रांनीही माझी मदत केली. "

स्वतः हाताने जेवण तयार करतो अक्षय

अक्षय पुढे म्हणाला की, विकत घेण्यापेक्षा स्वतः जेवण तयार करणे सोपे आहे. त्यामुळे मी स्वतः पोळी-भाजी बनवण्याचा विचार केला. या अन्नाला अक्षयने उपाशी आणि मजुर ज्या ठिकाणी राहत होते, त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. तो हे अन्न आपल्या ऑटो रिक्शामधून मालधक्का चौक, संगमवाडी आणि येरावडासारख्या ठिकाणावरील गरिबांना देतो.

बातम्या आणखी आहेत...