आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा काय करायचे ते आम्ही ठरवू; पुण्यातील लॉकडाउनवरून खासदार गिरीश बापट आक्रमक

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत : गिरीश बापट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलैपासून पुण्यात कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला. मात्र अजित पवारांच्या या निर्णयाला अनेकांकडून विरोध दर्शवला जात आहे. पुणे व्यापारी संघानंतर भाजप खासदार गिरीश बापट यांनी अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता?

'मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका, असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचे हे आम्ही ठरवू, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला. 

जीव जसा महत्वाचा, त्यानुसार जीवन सुद्धा महत्वाचे

लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवले, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसं पुण्यात होत नसून, मनमानी कारभार असल्याचा आरोप गिरीश बापट यांनी केला. यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. लोकं ऐकत नसेल तर दंडात्मक कारवाई करा. मात्र दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारने बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिले नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.  जीव जसा महत्वाचा आहे त्यानुसार जीवन सुद्धा महत्वाचे आहे, असे बापट म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...