आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लॉकडाऊनचा फज्जा:पुणे शहरात पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचा फज्जा, शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुक कोंडी

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपासून शहरात कडेकोट लॉकडाऊन करण्यात आले आहे. आणि हे आज सकाळचे चित्र...
  • पुण्यात लॉकडाऊनदरम्यान कोणाला सूट आणि कोणावर प्रतिबंध येथे जाणून घ्या
Advertisement
Advertisement

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने आजपासून शहरात कडेकोट लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, औद्योगिक वसाहती, त्याचबरोबर कमी लोकसंख्येत सरकारी कार्यालय सुरु आहेत.यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली आणि लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेल्या एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. परंतु जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर झाली असून या कालावधीत उद्योग, आस्थापना, कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात प्रवासासाठी लागू रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि कृषी कंपन्या कडक टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळातदेखील सुरू राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलिस पासची गरज नसेल, असे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कळवले आहे. 

मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व्यावसायिक, आणि रुग्णवाहिकांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या पासची अथवा परवानगीची गरज नाही. तसेच पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते 6 वेळेत शासकीय, अत्यावश्यक सेवेतील तसेच कंपन्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांसाठी सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, जेजुरी, कुरकुंभ सह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्र सुरु राहतील, ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामपंचायती, तालुक्याच्या ठिकाणची शेती संबंधित खते, औषधे व अवजारांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. ग्रामीण भागात नागरिकांनी कामाशिवाय बाहेर फिरु नये, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आवाहन केले आहे.

Advertisement
0