आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मिनी लॉकडाऊन:एक आठवड्यासाठी पुणे शहरातील हॉटेल, बार आणि रेस्तराँ राहणार बंद; पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामजिक कार्यक्रमांवर आठवडाभरांसाठी बंदी

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आढावा बैठक घेतली होती. दरम्यान, त्यांनी पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बार, हॉटेल आणि रेस्तराँ एक आठवड्यासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या काळात होम डिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे. यावितिरिक्त पुणे शहारातील पीएमपीएलची बस सेवादेखील एक आठवड्यासाठी बंद असणार असल्याची माहिती त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सामजिक कार्यक्रमांवर आठवडाभरांसाठी बंदी
पुणे शहरात होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांवर एक आठवडयासाठी बंदी असणार आहे. यामध्ये लग्नसमारंभसाठी 20 लोकांना परवानगी असेल. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राव यांनी दिली.

याबाबत सौरभ राव म्हणाले की, 'जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील.

परीक्षांचे काय?

सौरभ राव पुढे म्हणाले की, दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.

बातम्या आणखी आहेत...