आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य परिषदेच्या परीक्षाही आता ऑनलाइन होणार:जुलै अखेर प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विशेष पुरस्काराची घोषणा

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही मराठी भाषा व साहित्यक्षेत्रात काम कारणारी 115 वर्षे जुनी साहित्य संस्था आहे. मराठी भाषेचे संवर्धन आणि तिची अभिवृद्धी व्हावी, या हेतूने परिषदेमार्फत गेल्या 84 वर्षांपासून (1938 पासून) मराठी परीक्षांचे आयोजन केले जाते. मराठी प्रथमा, प्रवेश, प्राज्ञ, साहित्य विशारद या परीक्षांचा प्रतिवर्षी राज्यभरातून हजारो विद्यार्थी लाभ घेतात. या परीक्षांकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित व्हावेत, म्हणून शैक्षणिक वर्ष 2022 पासून परीक्षांचे स्वरूप बदलण्यात येत आहे. परीक्षेला बसणाऱ्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याबरोबरच प्रत्येक परीक्षेत प्रथम येणाऱ्यास रोख रकमेचे बक्षीसही देण्यात येणार आहे.

प्रा. जोशी म्हणाले की, ' मसापच्या ज्या शाखेमधून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसवले जातील त्या शाखेस डॉ. न. म. जोशी भाषा संवर्धन पुरस्कार (पाच हजार रुपये रोख व प्रशस्तिपत्र) देण्यात येईल.

विद्यार्थी पुरस्कार - सर्व शाखांमधून मिळून प्रत्येक परीक्षेत (प्रथमा, प्रवेश, प्राज्ञ) गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास डॉ. न. म. जोशी पुरस्कार (एक हजार रुपये रोख व प्रशस्तिपत्र) देण्यात येईल.

शिक्षक पुरस्कार - ज्या शाळेतील जास्तीत जास्त शिक्षक साहित्य विशारद या परीक्षेला बसून गुणानुक्रमे प्रथम येतील अशा शिक्षकास डॉ. न. म. जोशी पुरस्कार (एक हजार रुपये व प्रशस्तिपत्र) देण्यात येईल.'

माधव राजगुरू म्हणाले की, 'शाळांना विशेष प्रशस्तिपत्र : मसापच्या सर्व परीक्षांना ज्या शाळांमधून 300 हून अधिक विद्यार्थी बसवले जातील, अशा सर्व शाळांना विशेष प्रशस्तिपत्रे देण्यात येतील. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी बसावेत, म्हणून परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहेत.'

प्रथमा आणि प्रवेश या परीक्षांना दहावीपर्यंतचे विद्यार्थी बसतात. या परीक्षांमध्ये लघुत्तरी व वस्तुनिष्ठ प्रश्नाचे प्रमाण वाढवण्यात येईल. शक्य तेथे या परीक्षा (विशेष करून पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी) ऑनलाइन घेण्याचा विचार सुरू आहे. वरील परीक्षा साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घेतल्या जातात. तत्पूर्वी जुलै अखेर प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाते.

बातम्या आणखी आहेत...