आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्यात एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये कोरोनाचा ब्रिटेनमधील स्ट्रेन आढळण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती 11 दिवसांपूर्वी लंडनमधून पुण्यात आली होती. यानंतर त्याला शहरातील नायडू रुग्णालयातील एका स्पेशल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. सध्या तो असिम्प्टोमॅटिक (विना लक्षण) आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी(NIV) त्यांच्या इतर टेस्ट करत आहेत. या संपूर्ण टेस्टमध्ये दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो. जिल्हा प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू केले आहे.
पुण्यात 25 नोव्हेंबरपासून सुमारे 544 लोक ब्रिटनमधून आले आहेत. सर्वांचा मागोवा घेण्यात येत आहे. महाराष्ट्र एपिडेमिओलॉजी सेलचे प्रमुख डॉ. प्रदीप अवाटे म्हणाले की, 25 नोव्हेंबरपासून ब्रिटनमधील 3 हजार लोकांची महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने यादी केली आहे. यापैकी 116 जणांना ट्रॅक करण्यात आले असून 52 ची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली आहे. डॉ. आवटे यांनी सांगितले की, नागपुरात नवीन स्ट्रेन आल्याच्या संशयावरून अॅडमिट व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेला यूके ते मुंबईकडे प्रवास करणार्या 1,500 प्रवाशांची यादी मिळाली आहे. प्रत्येकाला चाचणी करण्यास सांगितले जात आहे. प्रत्येकाची चाचणी शनिवारपासून सुरू केली जाईल.
राज्यात आतापर्यंत 94.5 टक्के रुग्ण बरे झाले आहेत
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3171 नवीन संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. यासह राज्यात एकूण बरे होणार्या रुग्णांची संख्या 18,04,871 झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची एकूण टक्केवारी 94.5 आहे. राज्यात अद्याप 54,891 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 3580 नवीन रुग्ण आढळले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.