आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलास दारुच्या नशेत वडिलांनी शिवीगाळ केल्याचा राग आल्याने पोटच्या मुलाने त्यांना काठीने बेदम मारहाण करीत गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.रवी सुर्यभान क्षीरसागर (वय -५२) असे खून केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी ओंकार रवी क्षीरसागर (वय- २७ रा. मांजरी बुद्रूक,पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रेखा रवी क्षीरसागर( वय -४३) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
रवी क्षीरसागर कुटूंबिय मांजरी बुद्रूक परिसरातील घुले पाटील कॉलनीत राहायला आहे. मागील काही महिन्यांपासून रवी क्षीरसागर यांना दारुचे व्यसन लागले होते. नऊ मे रोजी रात्री दारु पिउन घरी आल्यानंतर त्यांनी मुलगा ओंकारला वाईट शिवीगाळ केली. त्याचा राग आल्यामुळे ओंकारने वडिलांना काठीने बेदम मारहाण केली आणि त्यांचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी पतीचे धार्मिक विधी उरकल्यानंतर पत्नी रेखा क्षीरसागर यानी स्वतःच्या मुलाविरुद्ध तक्रार दिली आहे.याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव पुढील तपास करीत आहेत.
घरगुती वादातून भावाला हॉकी स्टीकने मारहाण
घरगुती वादातून सख्या भावानेच साथीदारांच्या मदतीने भावाला हॉकी स्टीकने मारहाण करीत त्याच्या ज्यूस सेंटरची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी सात ते आठ जणांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिक मेसा माने, विशाल शिंदे, यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा माने (वय -४६, रा. धनकवडी,पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा आणि माणिक सख्खे भाउ असून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. त्याच रागातून दहा मे रोजी रात्री माणिकने सात ते आठ साथीदारांना बोलावून घेत हॉकी स्टीकने मारहाण केली. त्यानंतर सारसबाग चौपाटी परिसरात असलेल्या ज्यूस सेंटरची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस भोसले पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.