आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुदत ठेव रकमेच्या सहापट कर्ज अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत देण्याच्या आमिषाने कुबेर शक्ती मल्टीपर्पझ इंडिया लिमिटेडने ११२ गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांची ६८ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शिरीष ऊर्फ ओम ज्ञानदेव खरात (वय ३८, रा. नाशिक) याला चंदननगर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.
या फसवणूक प्रकरणात गुंतवणूक झालेल्यांची संख्या आणि रक्कम वाढण्याची शक्यता आहे. ख्ररात याच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी, तसेच अटकेतील व्यक्तीवर नाशिक येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. त्याने आणखी काही शहरांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याच्या तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात शादाब गुलाम शेख याच्यावरही गुन्हा दाखल आहे.
१७ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०२१ च्या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत जितेंद्र शुक्ला (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. कुबेर शक्ती मल्टीपर्पझ इंडिया लिमिटेड या नावाने खराडी येथील प्राईड आयकॉन १०५ येथे ऑफिस सुरू केले होते. तेथे मुदतठेवीच्या सहापट कर्ज महिन्यात देण्याचे आमिष दाखविण्यात आले. फिर्यादींना व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी १ लाख रुपयांची मुदतठेव ठेवली होती. त्यांना महिन्यानंतर कर्ज आणि भरलेली रक्कम परत मिळालीच नाही. तसेच, इतर लोकांचीही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.