आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाला मिळालेले स्वातंत्र्य हे ब्रिटिशांकडून भिकेत मिळाल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौत हिने केले हाेते. मात्र, यावर चौफेर टीका करत काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी आझादी भिकेत भेटत नाही, तर पुरस्कार भिकेतून मिळतात, असे सांगत कंगनावर निशाणा साधला. आझादी ही संघर्ष, त्याग, समर्पणातून मिळत असते. ब्रिटिशांनी ‘ताेडा-फाेडा अन् राज्य करा’ सूत्राचा अवलंब केला. त्याचाच वापर सध्याचे केंद्र सरकार करत असून मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष्य विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त मुद्दे समाेर आणले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आयाेजित ‘देशातील बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती’ या विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश काेळपकर, सरचिटणीस डाॅ. सुजित तांबडे, खजिनदार नीलेश राऊत व्यासपीठावर उपस्थित हाेते.
कन्हैयाकुमार म्हणाले, देश आमच्यासाठी प्रथम असून देशापासून आझादीची मागणी आम्ही कधीच केली नाही, तर देशातील समस्यांपासून नागरिकांची सुटका व्हावी याकरिता आझादीची मागणी करण्यात आली. काँग्रेस पक्ष देशातील केवळ राष्ट्रीय राजकीय पक्ष नसून भारतीय संस्कृतीची गुणविशेषत: म्हणून पक्ष प्रतिबिंबित हाेताे. सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, प्रगतिशीलता ही भारताची स्वत:ची विशेषता असून काँग्रेस पक्ष मजबुतीने सत्ताधाऱ्यांविराेधात लढू शकताे हे त्यांना माहिती असल्याने ते सातत्याने काँग्रेसवर हल्लाबाेल करतात.
मोदीच देशासमोरील समस्या : पंतप्रधान नरेंद्र माेदी हे देशासमाेरील समस्या असून त्यांना केवळ पर्याय न पाहता ताे एक राेग समजून त्यावर उपाय झाला पाहिजे. लाेकशाहीत मतदानाच्या माध्यमातून हुकूमशाहीकडे ते वाटचाल करत असल्याने सरकारविराेधात जनता संघर्ष सुरू झाल्याचे शेतकरी आंदाेलनातून दिसून आले आहे. काँग्रेस पक्ष कमजाेर असून ताे आपल्याविराेधात लढू शकत नाही, असे चित्र जाणीवपूर्वक भाजप तयार करत असल्याचा आराेपही त्यांनी या वेळी केला.
काळा पैसा, २जी घाेटाळ्याचे काय झाले?
पंतप्रधान माेदी सत्तेवर येण्यापूर्वी दिल्लीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी काळ्या पैशाविराेधात आंदाेलन केले. २ जी घाेटाळ्याचे सरकारवर आराेप झाले, कॅग रिपाेर्टचे ताशेरे आेढले गेले. परंतु भाजप सत्तेत आल्यावर त्याचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करत कन्हैयाकुमार म्हणाले, सध्या खुलेआम सरकार बँकांची विक्री करत आहे. माेठमाेठे बँक घाेटाळे हाेऊन सरकारचे साथीदार पैसे घेऊन देशाबाहेर पसार हाेतात, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.