आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय! सिंहगडरोडवर पोलिसांचा छापा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिंहगड रोड परिसरातील माणिकबाग याठिकाणी आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाच्या छाप्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस शिपाई अमित प्रकाश जमदाडे यांनी आरोपीं विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गणेश सोमलिंग चलवादी (वय 30), आणि वैशाली (वय 34) या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश चलवादी यास पोलिसांनी अटक केली आहे. तर या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकास सिंहगड रोड परिसरात माणिकबाग याठिकाणी अभिमन्यू पुरम येथील तिसऱ्या मजल्यावर एका आयुर्वेदिक मसाज सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या संदर्भातली खातरजमा केल्यावर संबंधित आरोपी हे पीडित मुलींना वेश्याव्यवसाय करता प्राप्त करून घेऊन, त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत होते.

मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असताना आरोपी मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी 30 वर्षाच्या आणि 40 वर्षाच्या दोन महिलांची पोलिसांनी वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजूरकर पुढील तपास करत आहे.