आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण, प्रकृती स्थिर; ट्विटरवरून दिली माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझी प्रकृती स्थिर, लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल - मुरलीधर मोहोळ
Advertisement
Advertisement

मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. पुण्यात आजपर्यंत 26 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले असून जवळपास 880 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ हे अनेक ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते. दरम्यान मोहोळ यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील - मोहोळ

मोहोळ यांनी ट्विट केले की, "थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोनाची टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील."

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा मृत्यू 

आजच पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला. दत्ता साने यांच्या निधनानंतर इतर नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

राज्यात याआधी अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण

राजकीय नेत्यांमध्ये राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर जितेंद्र आव्हाड कोरोनामुक्त झाले. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अशोक चव्हाण हे उपचारासाठी नांदेडहून मुंबईत दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर तेही पुन्हा सुखरूप घरी परतले. त्यानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली. मुंबईतील एका रुग्णालयातील 11 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली.

Advertisement
0