आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे कोरोना:महापौरांचा दावा : कोरोनामुळे झालेल्या किमान 400 मृत्यूंबाबात कोणतीही नोंद नाही, प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महापौरांनी हा मुद्दा उपस्थित केला होता

पुणे शहरात संशयितरित्या कोविड -19 मुळे किमान 400 मृत्यूंची कोणतीही नोंद नाही असा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, त्यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उचलला होता. महापौर म्हणाले की, हे मृत्यू ससून जनरल रुग्णालय आणि शहरातील खासगी रुग्णालयांत झाले आहेत. शहरातली ससून रुग्णालयात दररोज किमान 12 संशयित रुग्णांचा मृत्यू होत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

यामुळे होतोय गोंधळ

मोहोळ यांनी दावा केला की, या मृतांचा हिशोब यामुळे ठेवता येत नाही कारण हे रुग्ण एकतर मृतावस्थेत रुग्णालयात येतात किंवा येथे आल्यानंतर त्यांचा लगेच मृत्यू होतो. ते म्हणाले की, दिशा-निर्देशांनुासर, मृत व्यक्तीचा कसलाही तपास केला जात नाही. पण जेव्हा डॉक्टर या लोकांचा एक्स-रे घेतात, तेव्हा त्यात कोविड-19 लक्षणे दिसून येतात.

वेळेवर उपचार करण्यासाठी रुग्णांचे लवकर निदान झाले पाहिजे

मोहोळ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उचलण्यासोबतच असे मृत्यू थांबवण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, रुग्णांचे लवकर निदान व्हावे जेणेकरून त्यांना वेळेवर उपचार मिळतील आणि असे मृत्यू रोखले जातील.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

महापौरांच्या आरोपांनंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, या प्रकरणी चौकशी केली जाईल आणि ससून रुग्णालयाकडून एक रिपोर्ट मागवला आहे. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी ससून रुग्णालयात जात असतात आणि रेकॉर्ड तपासतात. पुण्यात कोणतीही चुकीची माहिती किंवा कमी माहिती दिली जाण्याची शक्यता कमी आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, डेटा एंट्री संबंधित काही मुद्दे असू शकतात पण महापौरांनी उद्धृत केलेली आकडेवारी संभव नाही. आम्ही निष्पक्ष चौकशी करू.

बातम्या आणखी आहेत...