आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे मेट्रोच्या उभारणीत आणि संचलनात महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. पुणे मेट्रोच्या विविध विभागांत महिला कर्मचारी कार्यरत आहेत आणि आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. बुधवारी मेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मेट्रोच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत ॲड विद्या यादव यांनी 'घरगुती छळ आणि वारसा संपत्ती हक्क' या विषयावर महिलांना मागर्दर्शन केले.
डॉ. रश्मी घोलप यांनी 'नातेसंबंध आणि जीवनात प्रगती साधणे', तर डॉ. अश्विनी जोशी यांनी 'जीवनशैली सुधारणे आणि जीवनात तंदुरुस्त आणि निरोगी राहणे' या विषयावर प्रात्यक्षिकपर माहिती दिली. कार्यशाळेत महिलांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली होती.
पुणे मेट्रोच्या कामात महिलांचा सक्रिय सहभाग आहे. पुणे मेट्रोच्या टनेलिंग आणि भूमिगत स्थानकांच्या उभारणीत शिवानी पवार यांसारख्या महिला अभियंत्या कार्यरत आहेत. स्वारगेट ते शिवाजीनगर स्थानक दरम्यानच्या भूमिगत कामाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पुणे मेट्रोच्या स्थानकांची रचना बनविण्याच्या कामात सुभद्रा मोरे, पंखुडी माथूर आणि शगुन गुप्ता या महिला अर्किटेक्ट कार्यरत आहेत.
स्थानकांची रंगसंगती आणि रचना, डिझाईन करण्याचे काम या करीत असतात. पुणें मेट्रोच्या जनसंपर्क विभागात उज्वला डेंगळे या कार्यरत आहे. पुणे मेट्रोच्या सर्व समाज माध्यमाचे अद्ययावतीकरण करण्याचे, पुणे मेट्रोची साईट सांभाळण्याचे आणि ती अद्ययावत करण्याचे, पुणे मेट्रोची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे काम त्या करीत असतात. पुणे मेट्रोच्या मानव संसाधन विभागात नीलिमा पाटणे आणि तृप्ती थेटे या महत्वपूर्ण पदावर असून कर्मचाऱ्यांचे ट्रेनींग, बढती, नवीन कर्मचारी भरती आणि कर्मचाऱ्यांच्या इतर समस्या सोडवण्याचे काम अतिशय व्यवस्थित रित्या सांभाळत आहेत.
पुणे मेट्रोच्या विधी विभागाची जबाबदारी अग्नेवा घोष यांच्यावर आहे. पुणे मेट्रोच्या विविध विषयाच्या केसेस, पर्यावरण विषयक केसेस, जमीन विषयक केसेस या त्यांनी व्यवस्थित रित्या हाताळल्या आहेत आणि त्यात उल्लेखनीय काम केले आहे. याचप्रमाणे पुणे मेट्रोच्या फायनान्स विभागातदेखील महिलांचा सहभाग आहे. मेट्रोच्या फायनान्स विभागात मनीषा कोचे आणि सविता मोहिते या महिला काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांचे पागार आणि इतर क्लेम, काँट्रॅक्टरचे बिल, आणि पुणे मेट्रोचा इतर खर्च असा फायनान्स विभागाचा कार्यभार या महिला सांभाळत असतात.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले की, पुणे मेट्रोच्या प्रत्येक विभागात महिला कार्यरत आहे ही बाब आनंददायी आहे. पुणे मेट्रोच्या बांधणीत महिला कर्मचाऱ्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. पुणे मेट्रोमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांनी प्रत्येक आघाडीवर सर्व संकटांवर मात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.