आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:मजुरांअभावी रुतले पुणे मेट्राेचे चाक; कोरोनामुळे फटका, मेट्राेच्या कामासाठी अद्याप दाेन हजार मजुरांचा तुटवडा

पुणे (मंगेश फल्ले- एसअायटी)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनामुळे पुणे मेट्राेच्या कामावर विपरीत परिणाम झाला अाहे. लाॅकडाऊनमध्ये पाच हजार मजुरांपैकी फक्त ८०० मजूरच कामावर होते. अनलाॅकनंतर गावी गेलेले मजूर परतले असले तरी अद्याप दाेन हजार मजुरांची कमतरता मेट्राेच्या कामाला जाणवत अाहे. पूर्ण क्षमतेने काम पूर्ववत सुरू हाेत नाही ताेपर्यंत मेट्राे नेमकी रुळावरून कधी धावणार हे सांगता येत नसल्याचे पुणे मेट्राे प्रशासनाने स्पष्ट केले अाहे.

पुण्यातील मेट्राे प्रकल्प ११४२० काेटी रुपये खर्चाचा अाहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर ते फुगेवाडी व पुणे शहरातील काेथरुड परिसरातील वनाज ते डेक्कनजवळील गरवारे महाविद्यालय यादरम्यान प्रत्येकी पाच किलाेमीटर अंतराची मेट्राे सुरू करण्याचे निश्चित झाले. नाेव्हेंबर २०१७ पासून काम सुरू झाले. अातापर्यंत संत तुकारामनगर ते फुगेवाडीदरम्यान ८० %काम पूर्ण झाले अाहे. डिसेंबरपर्यंत मेट्रो कार्यरत करण्याचा मानस अाहे. वनाज ते गरवारेदरम्यान ६०% काम पूर्ण झाले असून या मार्गावर येत्या मार्चमध्ये मेट्रो सुरू करण्याची योजना अाहे. सुरुवातीला दाेन्ही शहरांत डिसेंबर २०१९ मध्ये त्यानंतर जून २०२० मध्ये मेट्राे सुरू होईल, असा दावा केला गेला. परंतु तांत्रिक अडचणी अाणि काेराेनाचे संकट यामुळे दाेन मुहूर्त चुकले. मार्चमध्ये काेराेनामुळे मेट्राेचे कामकाज ठप्प झाले. मात्र, कामाची गरज लक्षात घेता पुणे पालिका अायुक्तांनी पाच मेपासून कामाला मंजुरी दिली. मात्र याच काळात कामावरील बहुतांश मजूर घरी परतले. संथगतीने काम सुरू ठेवण्यात अाले.

सप्टेंबरअखेर बोगदा काम पूर्ण पुणे महामेट्राेचे अधिकारी हेमंत साेनवणे म्हणाले, मेट्राेच्या कामाकरिता मजुरांची कमरता जाणवत असली तरी दर अाठवड्याला ० ते १०० मजूर गावावरून परतत अाहेत. अजूनही ४० टक्के मजुरांची गरज अाहे. मेट्राेचे कामाचे टेंडर दिलेले असल्याने कामास उशीर हाेत असला तरी अार्थिक बजेटवर परिणाम हाेणार नाही. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान दाेन भुयारी मार्ग टनेल बाेअरिंग मशीनच्या आहाय्याने केले जात अाहेत. त्यापैकी एका बाेगद्याचे काम १४०० मीटर तर दुसऱ्या बाेगद्याचे काम एक हजार मीटरपर्यंत पूर्ण झाले अाहे. सप्टेंबरअखेरपर्यंत हे काम हाेणे अपेक्षित अाहे.